
सावर्डे : शेखर निकम प्रतिष्ठान व यंग बॉईज क्रिकेट क्लब सावर्डे यांच्या वतीने आयोजित केलेल्या आमदार शेखर निकम चषक २०२५ या चषकाचा मानकरी ठरला मीष्का स्पोर्ट्स टी डब्ल्यू जे डॉमिनेटर्स टेनिस जगतातील बलाढ्य संघटना पराभूत करून साईश स्पोर्ट्स सावंतवाडी व टी डब्ल्यू जे डॉमिनेटर्स यांच्यामध्ये झाला अंतिम सामना, प्रथम फलंदाजी करताना साईश स्पोर्ट्स सावंतवाडी संघाने 49 धावांचं उद्दिष्ट मीष्का स्पोर्ट्स या संघापुढे ठेवलं, हे लक्ष 5.2 षटकांमध्ये पूर्ण करून मीष्का स्पोर्ट्स टी डब्ल्यू जे संघाने आमदार चषकावर आपलं नाव कोरलं, माननीय आमदार शेखर गोविंदराव निकम यांच्या शुभहस्ते विजेत्या संघाला रोख रक्कम पाच लाख व आमदार चषक देऊन गौरविण्यात आले, तर उपविजेत्या संघाला रोख रक्कम दोन लाख 50 हजार व आमदार चषक देऊन माननीय प्रांत अधिकारी आकाश लिघाडे व माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने साह यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सामन्यांच्या अंतिम दिवशी स्पर्धेला भेट देण्यासाठी लांजा राजापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार किरण सामंत हे उपस्थित होते. बक्षीस समारंभास चिपळूण संगमेश्वर चे आमदार शेखर निकम, चिपळूण पंचायत समिती माजी सभापती सौ.पूजाताई निकम, चिपळूणचे प्रांत अधिकारी आकाश लिगाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, सावर्डे पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील,तसेच शेखर निकम प्रतिष्ठान अध्यक्ष सचिन पाकळे, यंग बॉईज क्रिकेट क्लब अध्यक्ष केतन पवार, अशोक काजरोळकर, विकास नलावडे,, संजय पाकळे,प्रशांत निकम,अनिरुद्ध निकम, उद्योजक रफिक चिलवान, अभिषेक सुर्वे, प्रथमेश निकम, गणेश सावर्डेकर, सतीश सावर्डेकर, अमोल सुर्वे ,शरद चव्हाण, डॉ. कृष्णकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य अंकिता सावंत, डॉ. खानविलकर मॅडम , पूनम पाकळे तसेच शेखर निकम प्रतिष्ठान व यंग बॉईज क्रिकेट क्लब चे सर्व ज्येष्ठ व कनिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.