पुढच्या वर्षी माझी देखील बैलगाडी या शर्यतीमध्ये असणार मंत्री उदय सामंत

प्रेक्षकांची लक्षणीय उपस्थितीने समाधान काम करण्यासाठी ऊर्जा मिळाली - संजय आंग्रे
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 27, 2023 21:25 PM
views 142  views

कणकवली - शिवसेनेचा सामाजिक उपक्रम स्तुत्य मंत्री उदय सामंत म्हणाले, कणकवली तालुका शिवसेनेतर्फे बैलगाडा शर्यत स्पर्धेचा आयोजित करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. हिंदूहृदयसम्राट तथा शिवसेनेप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांची शिवसेना पुढे नेण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करीत आहेत. कणकवली तालुका शिवसेनेने यापुढील काळात सामाजिक उपक्रम राबवून संघटना मजबूत करावी. पुढील वर्षी बैल ठरवून आपल बैलगाडा शर्यत स्पर्धेत आपण व रवींद्र फाटक बैलगाडी घेऊन सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगत विजेत्यांचेही तोंडभरून कौतूक केले.

 जानवली - वायंगवडेवाडी येथील मैदानावर रंगलेल्या बैलगाडा शर्यत स्पर्धेत राज्यस्तरीय गटात सूरज सावंत यांची बैलगाडी तर जिल्हास्तरीय गटात हळवलच्या अमोल ठाकूर यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक मिळवला. आहे या स्पर्धे संदर्भात जिल्हाध्यक्ष आग्रे यांनी बोलताना सांगितले की  स्पर्धेदरम्यान बैलांची चित्तथरारक अशी दौंड प्रेक्षकांना 'याची देही याची डोळा' पाहाता आली. स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांची लक्षणीय उपस्थित होती. त्यामुळे एवढी लक्षणे उपस्थित पाहून आपण पहिल्याच कार्यक्रम यशस्वी केला असल्याचे आग्रे यांनी सांगितले.

कणकवली तालुका शिवसेनेच्यावतीने जानवली - वायंगवडेवाडीतील मैदानावर विनाफटका बैलगाडा शर्यत आयोजित केली होती. ही स्पर्धा राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय गटात पार पडली. राज्यस्तरीय स्पर्धेत हरकुळ बु. येथील अनुराग वावटे यांच्या बैलगाडीने द्वितीय तर चैताली शरद ठाकूर यांच्या बैलगाडीने तृतीय क्रमांक मिळवला. या स्पर्धेत ११ जणांनी सहभाग घेतला होता.

जिल्हास्तरीय गटात कुंदे येथील राजेंद्र श्यामसुंदर बागवे यांच्या बैलगाडीने द्वितीय तर कणकवलीतील अवधुत सुरेश राणे यांच्या बैलगाडीने तृतीय क्रमांक मिळवला. या स्पर्धेत पिटू साटविलकर हा उत्कृष्ट डायव्हर ठरला. तर संजय साटम यांची बैलगाडी उत्कृष्ट ठरली. यात २१ जणांनी सहभाग घेतला होता. पंच म्हणून नीळकंठ मेस्त्री यांनी काम पाहिले.

स्पर्धेतील विजेत्या संघांना उद्योगमंत्री उदय सामंत व रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार ब्रिगेडीअर सुधीर सावंत, जिल्हाप्रमुख संजय आग्रे, उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत, शेखर राणे, सचिव किसन मांजरेकर, खजिनदार भास्कर राणे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, महिला आघाडीच्या उपतालुकाप्रमुख आयेशा सय्यद, नगरसेविका माही परुळेकर, शहरप्रमुख बाळू पारकर, दामू सावंत यांच्यासह सेनेचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कणकवली तालुका शिवसेनेच्यावतीने मंत्री उदय सामंत व आमदार रवींद्र फाटक यांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना नेते तथा माजी खासदार ब्रि. सुधीर सावंत यांच्या हस्ते झाले.. यावेळी सेनेचे स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. स्पर्धेचे समालोचन पुंडलिक तोडणकर यांनी केले. 

आमदार नीतेश राणेंनी दर्शवली स्पर्धेला उपस्थिती

कणकवली तालुका शिवसेना आयोजित बैलगाडा शर्यत स्पर्धेला आमदार नीतेश राणे यांनी भेट देत आयोजकांचे कौतूक केले. राज्यात शिंदे-फडवणीस सरकार असून हे सरकार सामाजहिताचे निर्णय घेऊन जनेतेची सेवा करीत आहे. राज्यातील सरकार हे जनेतेच्या हितासाठी काम करीत आहे, असे श्री. राणे यांनी सांगितले.