
दोडामार्ग : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री नाम.रामदास आठवले रविवार दि.१ सप्टेंबर २०२४ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून ते मालवण राजकोट ला भेट देणार आहेत, अशी माहिती पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव - रमाकांत जाधव यांनी दिली.
नौदल दिनानिमित्त राजकोट येथे आठ महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कोसळला या घटनेची प्रत्यक्ष पहाणी करण्यासाठी रविवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री नाम.रामदास आठवले भेट देवून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत. सकाळी ११ मोपा विमान तळावर आगमन होणार आहे. ते तेथून थेट राजकोटला रवाना होणार आहेत.
पक्षाचे जिल्हा अध्यक्ष-अजीत कदम यांचेसह जिल्ह्यातील पक्षाचे जिल्हा पदाधिकारी,सर्व तालूका पदाधिकारी,युवक ,महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून आठवले साहेबांचे स्वागत करणार असल्याची माहिती देण्यात आली.