देवगड प्रीमियर लीग आमदार चषक स्पर्धेत मंत्री नितेश राणेंची उपस्थिती

यंगस्टार क्रिकेट क्लब साईश इलेव्हन सावंतवाडी संघाने मारली बाजी
Edited by:
Published on: March 25, 2025 17:56 PM
views 199  views

देवगड : साईश इलेव्हन सावंतवाडी संघाने अंतिम सामन्यात बालाजी क्लब राजकोटचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले.यंग स्टार क्रिकेट क्लब देवगड प्रीमियर लीग आमदार चषक ऑल इंडिया ओपन डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

देवगड येथे करण्यात आले होते.

 यंग स्टार क्रिकेट क्लब देवगड प्रीमियर लीग आमदार चषक ऑल इंडिया ओपन डे नाईट क्रिकेट स्पर्धा २०२५ यंग स्टार क्रिकेट क्लब देवगड या मंडळांनी भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेच्या चषकावर साईश इलेव्हन सावंतवाडी या संघाने आपले नाव कोरले असून रोख रक्कम 3 लाख 50 हजार व चषक देऊन गौरविण्यात आले तर बालाजी क्लब राजकोट या संघाने उपविजेता म्हणून आपले नाव कोरले.सेमी फायनल मॅन ऑफ द मॅच कृष्णा त्रिपाठी, मॅन ऑफ द मॅच दर्शन बांदेकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक भूषण गोळे, उत्कृष्ट गोलंदाज आर्यन भोईर, उत्कृष्ट बॅट्समन एजाज कुरेशिया,मालिकावीर प्रशांत घरत यांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. यावेळी नगरसेवक बुवा तारी,संतोष तारी,नगरसेविका प्रणाली माने,शहर अध्यक्ष दयानंद पाटील,कुणकेश्वर देवस्थान अध्यक्ष एकनाथ तेली, सहदेव बापर्डेकर,दिग्विजय कोळबकर,योगेश पाटकर, संजय तारकर,सिद्धेश माणगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.