मंत्री नितेश राणे यांचा 26 जुलैला 'जनता दरबार'

Edited by: विनायक गांवस
Published on: July 24, 2025 17:18 PM
views 180  views

सावंतवाडी : अनुसूचित जाती समाजाच्या विविध समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी सिंधुदुर्ग येथे जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली हा जनता दरबार शनिवार, २६ जुलै २०२५ रोजी दुपारी २:०० वाजता, जिल्हा नियोजन सभागृह, सिंधुदुर्ग येथे पार पडेल. याबाबतची माहिती जिल्हा भाजप सरचिटणीस महेश सारंग यांनी दिली.

अनुसूचित जाती समाजातील ज्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारच्या अडचणी, तक्रारी किंवा समस्या असतील, त्यांनी स्वतःच्या लेखी निवेदनासह या जनता दरबारात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्गचे सरचिटणीस महेश सारंग यांनी ही माहिती दिली असून त्यांनी अधिकाधिक SC समाजातील नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याची विनंती केली आहे. या माध्यमातून समाजाच्या समस्या थेट पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.