
वैभववाडी : मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा उद्या दि. ४ जानेवारीला वैभववाडीत भाजपाच्यावतीने नागरी सत्कार करण्यात येणार आहे. सकाळी ११ वा. भाजपा कार्यालयासमोर हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
मंत्री राणे यांचा मागील आठवड्यात नागरी सत्कार आयोजित केला होता. तो काही कारणास्तव रद्द करण्यात आला होता. आता हा सोहळा शनिवारी सकाळी ११ वा. होणार आहे. तालुक्यातील नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांनी केले आहे.