
कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी काल रविवारी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री नितेश राणे हे पहिल्यांदाच सिंधुदुर्गात दाखल होत असल्याने २२ डिसेंबरला त्यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भव्य स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत व माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
तसेच २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता कणकवली पटवर्धन चौकात कणकवली शहर व तालुका भाजपाच्या वतीने भव्य स्वागत व तिथून रॅली काढून कणकवली मतदार संघाच्या वतीने आमदार नितेश राणे यांचा कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील पटांगणावर 6.30 वा .नागरी सत्कार सोहळा देखील करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या नागरिकांना राज्याचे मंत्री नितेश राणे यांचा सत्कार करायचा आहे त्यांनी संध्याकाळी 6.30 वाजता या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत यांनी केले आहे. समीर नलावडे व गोट्या सावंत यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून न भूतो न भविष्यती असा हा सत्कार सोहळा होणार असल्याची माहिती श्री नलावडे यांनी दिली.