LIVE UPDATES

दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीत मंत्री नितेश राणे यांचा समावेश

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 30, 2026 10:38 AM
views 46  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

सिंधुदुर्ग : राज्यात अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. 

२९ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.ही उपसमिती राज्यातील अपुऱ्या पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन वेळोवेळी परिस्थितीचे संनियंत्रण करेल आणि योग्य त्या उपाययोजना राबवण्यासाठी कार्य करणार आहे.