
कणकवली : सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीतील परमहंस भालचंद्र महाराज यांचे दर्शन घेतले. यावेळी श्री देव काशी विश्वेश्वर, श्री देव मारुती मंदिर, दत्त मंदिर आदी देवतांचेही राणे यांनी दर्शन घेतले. यावेळी भालचंद्र बाबा मठाचे व्यवस्थापक विजय केळुसकर, भाजपा शहर अध्यक्ष तथा नगरसेवक पदाचे उमेदवार अण्णा कोदे, राजा पाटकर आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.










