मंत्री नितेश राणेंचा मराठा समाजाच्यावतीने सावंतवाडीत होणार भव्य सत्कार

Edited by: विनायक गांवस
Published on: December 21, 2024 15:46 PM
views 125  views

सावंतवाडी : हिंदूरक्षक व मराठा समाजाचे नेते आम. नितेश राणे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्याने त्यांचा २५ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता जगन्नाथराव भोसले उद्यान समोरील पटांगणावर भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीनेही मंत्री नितेश राणे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहवे असे आवाहन सकल मराठा समाजाचे सावंतवाडी अध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.


सिंधुदुर्ग मराठा समाजाच्या उन्नतीसाठी सदैव कार्यरत असलेले व कणकवली मतदारसंघातून सलग तीन वेळा विक्रमी मतांनी विजयी झालेले आमदार नितेश राणे यांची हिंदूरक्षक अशी छाप आहे. त्यांच्या मतदारसंघातील कार्याची दखल घेऊन त्यांची राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून संधी दिली. या संधीचे मंत्री नितेश राणे निश्चितच सोने करतील असा विश्वास सकल मराठा समाजाचे सावंतवाडी अध्यक्ष सीताराम गावडे यांनी व्यक्त केला आहे.  मंत्री नितेश राणे यांचा सावंतवाडीत २५ डिसेंबर रोजी नागरी सत्कार करण्याचे निश्चित केले आहे. याचवेळी सावंतवाडी सकल मराठा समाजाच्या वतीने श्री. राणे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी या सत्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाचे सावंतवाडी अध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.