
सावंतवाडी : भाजपचे प्रभाग ९ चे उमेदवार सौ. निलम नाईक आणि ॲड. रूजूल पाटणकर यांच्या प्रचारासाठी पालकमंत्री नितेश राणे मैदानात उतरले. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्यासह सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन श्री. राणे यांनी केले. प्रभाग क्रमांक ९ मध्ये मंत्री श्री. राणे यांनी कॉर्नर बैठकांच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला. यावेळी युवराज लखमराजे भोंसले, माजी सभापती प्रमोद कामत, ॲड. परिमल नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.











