जनतेची सेवा आणि विकास हाच आमचा ध्यास : पालकमंत्री नितेश राणे

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 16, 2026 19:58 PM
views 25  views

वैभववाडी : गावांचा सर्वांगीण विकास आणि जनतेची सेवा करणे हीच आमची प्राथमिक जबाबदारी असून, दिलेला शब्द पूर्ण करण्याची परंपरा आमच्या विचारांत आहे. यापुढेही विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

उपळे डांगेवाडी येथील सिद्ध साई सेवा मंडळाच्या वतीने आयोजित सत्यनारायण महापूजा आणि साई भंडारा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी साई मंदिरात दर्शन घेत भाविकांशी संवाद साधला.कार्यक्रमादरम्यान सिद्ध साई सेवा मंडळाच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. मागील वर्षी मंदिरात झालेल्या कार्यक्रमावेळी साई मंदिरासाठी सभामंडप उभारण्याचे आश्वासन नितेश राणे यांनी दिले होते. त्यानंतर काही महिन्यांतच सभामंडपाचे काम पूर्ण झाल्याने ग्रामस्थ आणि भाविकांनी समाधान व्यक्त करत पालकमंत्र्यांचे आभार मानले. नव्याने उभारण्यात आलेल्या सभामंडपाचा उपयोग धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रमांसाठी होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

यावेळी भाजपा वैभववाडी मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, सभापती सिद्धेश रावराणे, भालचंद्र साठे, नासीर काझी, साची कोलते, सुवर्णा संसारे, देवानंद पालांडे, अशोक गावडे, सूर्यकांत गावडे, सरपंच दक्षता पालांडे, उपसरपंच नितीन जाधव, रामाने गुरुजी, अशोक नागले, किसन नागले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संदीप मोरे यांनी केले.

फोटो ओळी:उपळे साई मंदिरातील भंडा-याला पालकमंत्री नितेश राणेंनी उपस्थित राहून साईंच दर्शन घेतले.