
वैभववाडी : वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने राज्याचे मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांचा सत्कार करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या व्यापारी एकता मेळाव्याचे उद्घाटन मंत्री राणे यांच्या हस्ते झाले. या जिल्हा एकता मेळाव्याचे यजमानपद वैभववाडी तालुक्याकडे होते. त्यामुळे तालुका व्यापारी संघटनेतर्फे मंत्री राणे पालकमंत्री झाल्याबद्दल शाल, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तेजस आंबेकर, नेहा माईणकर, संजय सावंत, रणजित तावडे, अरविंद गाड, मनोज सावंत, नितीन महाडीक, रत्नाकर कदम, संजय लोके, रवींद्र पाटील, संतोष कुडाळकर आदी उपस्थित होते.