
दोडामार्ग : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसा निमित्त आज दोडामार्ग शिवसैनिकांनी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होत. दोडामार्ग शिवसेना कार्यालय येथे दीपक केसरकर यांच्या नावाचा केक कापून सर्व प्रथम त्यांना शुभेच्छा देत वाढदिवस साजरा केला. त्यांतर येथील ग्रामीण रुग्णालयातील सर्व सुरुग्णांना फळ वाटप करण्यात आले. त्या नंतर भेडशी येथे करूणा सदन स्कुलमध्ये विविध मैदानी स्पर्धा घेत सर्व मुळे व शिक्षकांच्या समवेत केक कापून वाढदिवस साजरा केला.
यावेळी तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, तुकाराम बर्डे, संपर्कप्रमुख प्रेमानंद देसाई, जिल्हा समन्वयक शैलेश दळवी, उपजिल्हा संघटक विलास सावंत, बाबाजी देसाई, तीलकांचन गवस, मायकल लोबो, विभाग प्रमुख रामदास मिस्त्री, संजय गवस, हर्षद सावंत, सज्जन धाऊस्कर, दादा देसाई, सूर्यकांत गवस,रामदास देसाई, विनायक शेटये, योगेश महाले, कार्यालय प्रमुख गुरूदास सावंत, गोकुळदास बोन्द्रे, समीर देसाई, महिला तालुकाप्रमुख चेतना गडेकर, महीला उपजिल्हाप्रमुख सानवी गवस, मनीषा गवस, शितल हरमलकर, करुणा मोरलेकर आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.