
सावंतवाडी : बेळगाव-वेंगुर्ला रोडवर पडलेल्या खड्ड्याबाबत आपण सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता यांचे लक्ष वेधले आहे. लवकरात लवकर या रस्त्याचे काम हाती घेण्यासाठी त्यांना सूचना करण्यात आल्या असून मतदारसंघातील अन्य विकास कामाबाबतही आपण लक्ष ठेवून असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी दिली.
राज्याच्या शिक्षणविभागात मोठ्या प्रमाणात विविध बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षणामध्ये महाराष्ट्र राज्य पुढच्या वर्षी एक नंबरवर असणार आहे. राज्य सरकारकडून लाखाहून अधिक जास्त सरकारी नोकर भरती करण्यात आली. तर राज्यात 61 हजार शिक्षकांना टप्पा अनुदानावर आणले. पुढच्या काळात विद्यार्थाना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. लवकरच माझी शाळा हे अभियान राबवण्यात येणार आहे तर पोषण आहारामध्ये बदल करण्यात आला असून आहारामध्ये अंडी देण्यात येणार आहेत तर मुलांना वाचन स्वच्छतेबाबतही आवड व्हावी यासाठी उपक्रम राबवण्यात येणार आहे शाळांमध्ये किचन गार्डन हा प्रयोगही मुलात आणण्यात येणार आहेत अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
मंत्री केसरकर पुढे म्हणाले, मराठा समाज बांधवांना आरक्षण देण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे परंतु सर्वोच्च न्यायालयात टिकणार आरक्षण मिळण्यासाठी मराठा बांधवांनी आंदोलन करण्यापेक्षा सरकारला डाटा मिळण्यासाठी सहकार्य करावे. तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये नुकत्याच होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिंदे गटाकडे एकही ग्रामपंचायत नसल्याचे चित्र उभे करण्यात आले मात्र आम्ही गाव पॅनल म्हणून निवडणुकीला सामोरे गेलो तर खानोली व मातोंड या दोन ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत लढवण्यात आली त्यामुळे काही ग्रामपंचायत नाही असा प्रचार करणे चुकीचे आहे. दुसरीकडे मी आमदारकी नाही तर खासदारकी लढवणार असा प्रचारही काही कडून करण्यात येत आहे. मात्र काहींच्या मनातील हा गैरसमज दूर करण्यासाठी मी 2024 मध्ये आमदारकीच लढवणार शिवाय पक्षाकडून खासदारकीसाठी या मतदारसंघातून जो कोणी उमेदवार असेल त्याला 50 हजार चे लीड मिळून देणार. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होऊ नये म्हणून राज्यातील शाळांमध्ये नेमण्यात आलेल्या निवृत्त शिक्षकांना अद्यापही मानधन मिळाले नसल्याबाबत श्री केसरकर यांचे लक्ष वेधले असता त्यांनी संबंधित शिक्षकांना तात्काळ मानधन देण्यात येणार असल्याचे सांगितले.