
दोडामार्ग : दीपावलीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी शनिवारी २ नोव्हेंबरला सायंकाळी दोडामार्ग बाजारपेठेत साटेली भेडशी बाजारपेठ व्यापारी दुकान व्यावसायिक यांची भेट घेऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच दोडामार्ग देव पिंपळेश्वरचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले.
दोडामार्ग येथे दीपक केसरकर यांनी बाजारपेठेतील सर्व दुकान व्यवसायिक, भाजीविक्रेते, फेरीवाले यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, राजू निंबाळकर, तिलकांचन गवस, भगवान गवस, मायकल लोबो, सत्यवान गवस, रमाकांत जाधव, योगेश महाले, नंदू टोपले, गोपाळ गवस, गुरूदास सावंत, महिला सानवी गवस, चेतना गडेकर, सविता नाईक, प्राची चव्हाण, संध्या प्रसादी, आदी मानयुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उवस्थित होते.
दिवाळीच्या सणाला मी आज सर्व व्यापाऱ्यांना शुभेच्छा दिल्या मन अगदी प्रसन्न झालं. दरवर्षी दोडामार्ग तालुक्यात दिवाळी यावस वाट मी अगोदर फक्तर सावंतवाडी शहरात दिवाळी ला शुभेच्छा देण्यासाठी फिरायचो मात्र आता दोडामार्ग, बांदा भेडशी या ठीकाणी दरवर्षी येईन आणि सर्व दुकान व्यापारी यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ईश्वर त्यांच्या सर्व इच्छा परिपूर्ण करो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो असे केसरकर यावेळी म्हणाले.