
दोडामार्ग : शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर यांनी दोडामार्ग दौऱ्यावर असताना तालुक्यातील पदाधिकारी - कार्यकर्ते यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर दोडामार्ग - गोवा येथे उभारण्यात आलेल्या चेकपोस्टचीही पाहणी केली. दोडामार्ग तालुक्यातील कोलझर येथील श्री माऊली देवीच्या पंचायतन देवतांचा पून: प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी ते दोडामार्गला आले होते.
यावेळी त्यांनी दोडामार्ग - गोवा येथे उभारण्यात आलेल्या चेकपोस्टची पाहणी करून त्यानंतर त्याठिकाणी उपस्थित असलेल्या पदाधिकारी - कार्यकर्ते व पत्रकारांची भेट घेतली. तदनंतर मंत्री केसरकर पुढे कोलझर येथे प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी दखल झाले. यावेळी मंत्री केसरकर यांच्यासोबत विभागप्रमुख रामदास मेस्त्री, मायकल लोबो, कार्यालयीन प्रमुख गुरुदास सावंत, राघोबा केसरकर आदी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी कोलझर गावी भेट देत श्री देवी माऊली पून प्रतिष्ठापना सोहळ्यास हजेरी लावून श्री देवी माऊली चे आशीर्वाद घेतले. व ग्रामवासियानाही शुभेच्छा दिल्या.