साईंची पालखी खांद्यावर घेऊन मंत्री केसरकर प्रति शिर्डीस रवाना

Edited by: विनायक गावस
Published on: July 03, 2023 12:53 PM
views 306  views

सावंतवाडी : गुरूपौर्णिमेनिमित्त प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर प्रती शिर्डीस पायी चालत निघाले. साईंची पालखी खांद्यावर घेऊन मंत्री केसरकर माडखोलच्या दिशेने रवाना झाले. गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी केसरकर यांच्या निवासस्थानी पालखीचं पुजन करण्यात आले. यावेळी मंत्री दीपक केसरकर व सौ.‌पल्लवी केसरकर यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. आज सकाळी केसरकर यांच्या निवासस्थानाहून माडखोल येथील प्रति शिर्डीस पालखी रवाना झाली. 


याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, नंदू शिरोडकर, आबा केसरकर, सुजित कोरगावकर, वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, सुधीर धुमे, दत्ता सावंत यांसह मोठ्या संख्येने साईभक्त पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.