मांगेलीतील खचलेल्या रस्त्याची मंत्री केसरकरांनी केली पाहणी

Edited by: लवू परब
Published on: August 05, 2024 08:37 AM
views 122  views

दोडामार्ग : मांगेली कुसगेवाडी येथे भुसखलन होऊन रस्ता खचला होता त्या खचलेल्या रस्त्याची शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पाहणी करत तात्काळ त्या ठिकाणी सौरक्षक भिंत घालण्यासाठी प्रस्ताव करा अशा सूचना येथील जिप अभियंता अमित कल्याणकर यांना केल्या.

मुसळधार पडलेल्या पावसाने मंगळवारी मध्यरात्री मांगेली कुसगेवाडी येथे डोंगराचा काही भाग कोसळून रस्ता बंद झाला होता. व काही भाघाला भेगा पडून अजूनही डोंगर कोसळच्या स्थितीत आहे. याचे गाभीर्य घेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल रविवारी सायंकाळी 7.00 वाजता मांगेली येथे डोंगराची पाहणी केली यावेळी त्यांच्या सोबत तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस, सावंतवाडी विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रेमानंद देसाई, जिल्हा समन्वयक शैलेश दळवी, दादा देसाई, रामदास मेस्त्री, सज्जन धाऊसकर, बळीराम शेटये, योगेश महाले, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, उपतालुकाप्रमुख मायकल लोबो, गोपाळ गवस, गुरूदास सावंत  तहसीलदार अमोल पोवार, व इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी केसरकर यांनी येथील मांगेली कुसगेवाडी व देउळवाडी ग्रामस्त यांच्याशी संवाद साधला. ग्रामस्तानी आपल्या व्यथा मांडल्या घटना घडली त्या ठिकाणाहून अर्ध्या किमी अंतरावर गाव वस्ती आहे. त्यामुळे भविष्यात किणतीही जीवित या वित्त हानी होऊ नये या दृष्टीने तात्काळ या ठिकाणी उपायोजना करा असे ग्रामस्तानी सांगितले. यावेळी मंत्री यांनी उपस्तित जि.प चे अभियंता अमित कल्याणकर यानां सक्त सूचना करत तात्काळ सौरक्षक भिंत उभारण्यासाठी आरखडा तयार करा. असे सांगितले.