हत्तीबाधित गावांसाठी मंत्री केसरकर यांनी दिल्या बॅटरी

Edited by: संदीप देसाई
Published on: June 17, 2023 15:23 PM
views 141  views

दोडामार्ग : रात्रौ शेती बागायतीत घुसून शेतकरी व बागायतदार यांचे वन्य हत्ती नुकसान करत असल्याने दोडामार्ग तालुक्यांतील तळकट, झोळंबे व कोलझर तिन्ही गावांसाठी सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बॅटरी उपलब्ध करून दिल्या आहेत. दोडामार्ग तालुका शिवसेनेनं यासाठी मंत्री केसरकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता.


दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे कोलझर तळकट गावात धुमाकूळ घालूनकोठ्या प्रमाणात शेती बागायती नुकसान करत आहेत. त्यातच पाऊस सुरू असून वीज पुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे राञीच्या अंधारात जंगली हत्तींना हाकलून लावणे कठीण होत आहे. त्यामुळे सावंतवाडी मतदारसंघाचे  आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी हत्तींचा वावर असलेल्या झोळंबे, कोलझर तळकट येथील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या असून या बॅटऱ्यांचे वाटप नुकतेच दोडामार्ग तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले.

   कोलझर, तळकट, झोळंबे या गावात हत्तीचा उपद्रव वाढल्यामुळे तेथील लोकाना रात्रीचे हत्तीना हुसकावून लावण्यासाठी टॉर्चची गरज होती. सदर बाब आमदार केसरकर यांच्या निदर्शनास येताच तात्काळ त्यांनी स्व खर्चातून तिन्ही हत्तीबाधित गावातील सरपंचाकडे  टॉर्च (बॅटऱ्या) उपलब्ध करून दिल्या आहेत. दाजी देसाई व इतर ग्रामस्थ यांच्याकडे त्या सुपूर्द करण्यात आले. बॅटरी घेऊन हत्तींना हाकलून लावताना त्याचा मोठा उपयोग होऊ शकतो. 

  तळकट येथे संबंधित तिन्ही गावच्या सरपंचांकडे टॉर्च सुपुर्द करणेत आले. यावेळी दिपक केसरकर यांचे कार्यकर्ते तसेच उपतालुका प्रमुख शिवसेना दादा देसाई, विभाग प्रमुख रामदास मेस्त्री, लाडू आयनोडकर तसेच झोळंबे सरपंच विशाखा नाईक, तळकट सरपंच सुरेंद्र सावंत, कोलझर सरपंच सौ. सुजल गवस,  भोसले, उपसरपंच राजु गवस, रामदास देसाई उपस्थित होते. आवश्यक वेळी मंत्री केसरकर यांनी शेतकरी बागायतदार ग्रामस्थ यांना टॉर्च उपलब्ध करून दिलेमुळे उपस्थित सरपंचानी व ग्रामस्थांनी मंत्री केसरकर यांचे आभार मानले आहेत.


गणेशप्रसाद गवस यांनी केले विशेष प्रयत्न


खरं तर हत्तीबाधित गावात वन विभाग हत्ती उपायोजना योजने अंतर्गत मोफत वनव्यवस्थापन समितीकडे निधी उपलब्ध झालेनंतर वनविभाग मार्फत टेंडर काढून करून बॅटरी वाटप करण्यात येते. मात्र याला बराच कालावधी जाणार असल्याने व सध्या वाढता हत्ती उपद्रव व सातत्याने जाणारी लाईट त्यात पावसाचे दिवस या अनुषंगाने मंत्री महोदय यांचे शिवसेना तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी लक्ष वेधले. त्याला तातडीने प्रतिसाद देत मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्याकडून शेतकऱ्यांना आवश्यक बॅटरी  उपलब्ध करून दिल्या आहेत.