मंत्री केसरकरांकडून अमोल कळंगुटकर कुटुंबियांकडून 1 लाख 50 हजारांची मदत

Edited by: विनायक गावस
Published on: November 18, 2023 15:40 PM
views 338  views

सावंतवाडी : वीज दुरुस्तीचे काम करत असताना विजेच्या धक्क्याने निधन झालेल्या वीज कत्रांटी वायरमन व आरोस कळंगुटकरवाडी येथील कै.अमोल भरत कळंगुटकर (२५) यांच्या कुटुंबीयांना शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी एक लाख पन्नास हजाराची मदत केली आहे. त्यांच्या निवासस्थानी जात कुटुंबीयांकडे ही मदत त्यांनी सुपूर्द केली.

आरोस सरपंच शंकर नाईक यांनी याबाबत शिक्षणमंत्री केसरकर यांचे लक्ष वेधले होते.अमोल कळंगुटकर हा वीज वितरणचा कत्रांटी कामगार होता वीज दुरुस्तीचे काम करताना विजेचा धक्का लागत वीज खांबालाच तो लटकला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. आरोस ग्रामस्थांनी एकजूट दाखवून वीज ठेकेदारावर हलगर्जीपणाचा आरोप करुन कळंगुटकर कुटुंबीयांना मदत करण्यास भाग पाडले होते. शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी मंगळवारी कळंगुटकर कुटुंबीयांची सात्वंनपर भेट घेत एक लाख पन्नास हजाराची मदत सुपूर्द केली. तसेच शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन, अशी ग्वाही दिली.

यावेळी आरोस सरपंच शंकर नाईक,शिवसेना स्वीय सहाय्यक रामचंद्र आंगणे, बाळा शिरसाट, संजू पांगम, बाळा मोरजकर, देऊलकर, प्रसाद नाईक आदी उपस्थित होते.