
मालवण : महाराष्ट्र राज्याचे उद्यान, रोजगार हमी व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले उद्या, २४ मे २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते विविध विकासकामांचा आढावा घेणार असून, शिवसेना पदाधिकारी स्थानिक नागरिक व अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. अशी माहिती शिवसेना उपनेते संजय वसंत आग्रे यांनी दिली आहे.