मंत्री बावनकुळे यांनी घेतली खा. नारायण राणे यांची भेट

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: August 13, 2025 19:17 PM
views 209  views

कणकवली : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सिंधुदुर्ग जिल्हा दौºयावर आहेत. मंत्री बावनकुळे यांनी बुधवारी खासदार नारायण राणे यांच्या कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. राणे यांनी मंत्री बावनकुळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी नीलम राणे उपस्थित होत्या. कोकणातील विकासकामे, लोककल्याणकारी उपक्रम आणि आगामी योजनांविषयी दोघांमध्ये संवाद झाला.