
रोहा - मराठी पत्रकारांची मातृसंस्था म्हणुन परिचित असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या कार्याध्यक्षपदी मिलिंद सिताराम अष्टिवकर यांची निवड करण्यात आली आहे. जेष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या उपस्थितीत परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी पुणे येथिल मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात ही घोषणा केली.
रायगड जिल्हा प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष मिलिंद अष्टिवकर हे रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणीवर आहेत. यापूर्वी त्यांनी मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष, कोकण विभागीय सचिव म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष म्हणून देखील अष्टिवकर कार्यरत होते. त्यांच्या या कार्यकाळात कोकणातील अनेक ज्येष्ठ पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले. मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण करण्यासाठी केलेल्या यशस्वी आंदोलनांमुळे अष्टिवकर यांचा रायगड प्रेस क्लबच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संस्मरणिय ठरला. अष्टिवकर यांच्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या कार्याध्यक्ष पदी झालेल्या नियुक्तीचे सर्वस्तरातुन स्वागत होत असून परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, तालुकाप्रमुख समीर शेडगे, रायगड जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षा सुप्रियाताई पाटील, प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष भारत रांजणकर, परिषदेचे कोकण विभगिय सचिव जे डी पराडकर, रोहा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय देसाई, रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष शशिकांत मोरे,रोहा सिटिझन फोरमचे नितिन परब, प्रदिप देशमुख आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.