मिलाग्रीसमध्ये आज 'प्रायमरी ॲन्युल फंक्शन डे' !

अर्चना घारेंची असणार उपस्थिती
Edited by: विनायक गांवस
Published on: January 16, 2024 07:48 AM
views 99  views

सावंतवाडी : आज मंगळवार दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी मिलाग्रीस हायस्कूल व जुनिअर कॉलेज सावंतवाडीच्या पटांगणावर  "प्रायमरी ए ॲन्युल फंक्शन कम ग्रॅज्युएशन डे " च्या कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी 5:30 वाजता करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला  सावंतवाडी विधानसभा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा सौ. अर्चना घारे -परब या प्रमुख  अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर विशेष अतिथी म्हणून  फादर अँड्रु डिमेलो हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.

त्याकरिता मिलाग्रीस हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य रें.फादर रिचर्ड सालदाना यांनी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडील सर्व पालकांनी या विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमासाठी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे.