
कुडाळ : फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, आवळेगाव हायस्कूल व कला वाणिज्य उच्च माध्यमिक विद्यालय आवळेगावने शैक्षणिक क्षेत्रात आपले यश कायम राखले आहे. विद्यालयाचा एकूण निकाल ९०.९० टक्के लागला असून वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी निकालात बाजी मारली आहे.
वाणिज्य शाखेचे दैदिप्यमान यश
वाणिज्य शाखेतून एकूण २५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी २४ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेचा निकाल ९६ टक्के इतका लागला असून ५ विद्यार्थ्यांनी 'डिस्टिंक्शन' मिळवली आहे. तसेच ११ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि ५ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आले आहेत.
कला शाखेची कामगिरी
कला शाखेतून एकूण ८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेचा निकाल ७५ टक्के लागला असून यामध्ये १ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आले आहेत.
विद्यालयाच्या कला व वाणिज्य संयुक्त तुकडीचा विचार करता, एकूण ३३ विद्यार्थ्यांपैकी ३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाची एकूण उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९०.९०% इतकी आहे.
विद्यालयाच्या या यशाबद्दल व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे आवळेगाव परिसरात आनंदाचे वातावरण आहे.










