दोडामार्ग इंग्लिशचा संचित परब कॉलेज - तालुक्यात प्रथम

द्वितीय सिद्धेश सावंत ; तृतीय अनया गवस
Edited by: लवू परब
Published on: May 02, 2026 16:27 PM
views 52  views

दोडामार्ग :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ यांच्याकडून घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी फेब्रुवारी 2026 चा निकाल जाहीर झाला. यामध्ये दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी कु. संचित सुभाष परब 87.33% मिळून दोडामार्ग कॉलेज मध्ये व तालुक्यात सर्व शाखांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. द्वितीय सिद्धेश श्रीधर सावंत ७७. १७%, तर तृतीय अनया संतोश गवस ७५. ३३% आली आहे.

शाळेचा शाखानिहाय निकाल खालीलप्रमाणे.

एकूण प्रविष्ट विद्यार्थी 155, उत्तीर्ण 144

निकाल 93% निकाल लागला आहे. विज्ञान शाखा एकूण प्रविष्ट 74, उत्तीर्ण 71, निकाल 96%

प्रथम क्रमांक अनया संतोष गवस, 452 गुण (75.33%) (विज्ञान शाखेतून तालुक्यात द्वितीय), व्दितीय क्रमांक कु. अभिषेक कृष्णा तळणकर  426 गुण (71%) (विज्ञान शाखेतून तालुक्यात तृतीय) तृतीय क्रमांक कु. श्रेया तानाजी दळवी 397 गुण (66.17%), कला शाखा प्रविष्ट विद्यार्थी 45, उत्तीर्ण 40,निकाल 89%, प्रथम क्रमांक कु. सिद्धेश श्रीधर सावंत 463 गुण (77.17%) (कला शाखेतून तालुक्यात प्रथम) व्दितीय क्रमांक कु. सिद्धी संतोष गवस 409 गुण (68.17%) (कला शाखेतून तालुक्यात द्वितीय ) तृतीय क्रमांक कु. सेजल शिवानंद प्रभावळकर 386 गुण (64.33%) (कला शाखेतून तालुक्यात तृतीय) वाणिज्य शाखा प्रविष्ट विद्यार्थी 36 उत्तीर्ण 33, निकाल 92% प्रथम क्रमांक कु. संचित सुभाष परब 524 गुण (87.33%) (सर्व शाखेतून तालुक्यात प्रथम) व्दितीय क्रमांक कु. अतुल शिवराम मोर्लेकर 449 गुण (74.83%) तृतीय क्रमांक अनुज शिवराम मोर्लेकर 414 गुण (69%)       

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष विक्रांत विकासभाई सावंत, सदस्य जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, उपाध्यक्ष डॉ दिनेश नागवेकर, सचिव व्ही बी नाईक, खजिनदार सी एल नाईक, मुख्याध्यापक श्री संजय पाटील, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक