कै. हेमंत केशव रावऱाणे कनिष्ठ महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 02, 2026 16:31 PM
views 23  views

वैभववाडी : कै. हेमंत केशव रावऱाणे कनिष्ठ महाविद्यालय, वैभववाडीचा इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून सर्व विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. तालुक्यातील प्रथम तीन क्रमांक यांचं विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पटाकावले आहेत. या विद्यालयातून २०६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

शाखा निहाय निकाल पुढीलप्रमाणे,

कला शाखा :

कला शाखेत ४० विद्यार्थी परीक्षेला बसले होते व सर्व ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.यामध्ये प्रथम : निहारिका विठोजी पाटील – ५४० गुण (९०.००%),द्वितीय : संपदा त्रिम जाधव – ५३६ गुण (८९.३३%),तृतीय : रिया चंद्रकांत माळकर – ४३१ गुण (७१.८३%) मिळवून उत्तीर्ण झालीत.

वाणिज्य शाखा :

वाणिज्य शाखेत ७९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते व सर्व ७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.यामध्ये प्रथम : आकांक्षा अजित खाडये  ५४१ गुण (९०.१७%),द्वितीय : पायल प्रदीप लिंगायत – ५२३ गुण (८७.१७%),तृतीय : तृष्णा संदीप घाडी – ५११ गुण (८५.१७%) यांनी मिळविला.

विज्ञान शाखा :

विज्ञान शाखेत ८७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते व सर्व ८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.यामध्येप्रथम : गौरी संजय चव्हाण – ४७९ गुण (७९.८३%),द्वितीय : यश अशोक पाटील – ४७४ गुण (७९.००%),तृतीय : प्रिती नितीन रावऱाणे – ४६२ गुण (७७.००%) यांनी क्रमांक प्राप्त केला. 

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणा-या शिक्षकांचे संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी अभिनंदन केले.