
सावंतवाडी : धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित बांदा येथील खेमराज मेमोरिअल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी ) परीक्षेत आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेचा निकाल ९४.८२ टक्के लागला असून, गंधाली प्रशांत धुरी हिने ८५ टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. द्वितीय सोनाली तुकाराम हरमलकर ८४.८३ % तर विग्नेश विष्णू मळगांवकर ८३.६७% सह तृतीय क्रमांक पटकावला आहे.
प्रशालेच्या विविध शाखांमधून विद्यार्थी चमकले असून विज्ञान शाखा विनित रविंद्र पंडीत ८३.५०% प्रथम, आलिया अब्दूल मजिद खान ८०.५०% द्वितीय, तर पूर्वा उत्तम दळवी ७८.५०% हिने तृतीय क्रमांक पटकावला. वाणिज्य शाखेत गंधाली प्रशांत धुरी ८५.००% प्रथम, रोशनी रामकृष्ण गावडे ७८.३३% द्वितीय, तर कौशल्य आत्माराम मेस्त्री ७७.००% याने तृतीय क्रमांक मिळवला. कला शाखा ऋषिकेश काशिनाथ पंडीत ७३.१७% प्रथम, पेक्षा मुकेश वासानी ६८.१७% द्वितीय, तर रेश्मा रविंद्र नाईक ६७.१७% हिने तृतीय क्रमांक मिळवला. महाविद्यालयाचा एकूण निकाल ९४.८२ टक्के लागला आहे.
या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक आणि पालक वर्गातून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.










