मिलाग्रिस हायस्कूलच्या नवगतांना शालेय साहित्याच वाटप

Edited by: विनायक गांवस
Published on: June 15, 2024 14:42 PM
views 81  views

सावंतवाडी : येथील मिलाग्रिस हायस्कूलच्या भव्य पटांगणावर नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी विशेष परिपाठ तसेच प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. प्रवेशोत्सवाच्या विशेष दिनाचे औचित्य साधून शाळेत नूतन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना  शाळेच्या मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदन्हा व प्रमुख अतिथी प्रा. रूपेश पाटील यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले आणि प्रतिनिधिक स्वरूपात त्यांचे स्वागत करण्यात आले. 



 या कार्यक्रमासाठी  प्रा. रुपेश पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. तसेच प्राचार्य फादर रिचर्ड सालदन्हा, उपप्राचार्या  सिस्टर मेबल आणि पर्यवेक्षिका संध्या मुणगेकर टीचर याही कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या.  नूतन विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवाचे औचित्य साधत मीलाग्रिस हायस्कूलच्या नवनिर्वाचित पर्यवेक्षिका संध्या मुणगेकर टीचर तसेच इंग्रजी प्रायमरीच्या नवनिर्वाचित पर्यवेक्षिका क्लिटा परेरा टीचर यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास प्रा. रुपेश पाटील यांनी विद्यार्थी व पालकांना शिक्षणाचे महत्त्व विशद करीत आपल्या ओघवत्या शैलीत मार्गदर्शन केले. शेवटी प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमाची सांगता झाली.