
सावंतवाडी : स्वातंत्र दिनाचे औचित्य साधत सावंतवाडी पोलिसांनी अंमली पदार्थांच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी एक अभिनव उपक्रम राबवला. मिलाग्रिस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसोबत मोती तलावाच्या काठावर मानवी साखळी तयार करून 'अंमली पदार्थमुक्त भारत'चा संदेश देण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, मिलाग्रिस हायस्कूलचे प्राचार्य फादर रिचर्ड सालधाना आणि सहायक पोलीस निरीक्षक जयेश खदंकर यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी, शिक्षक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या मानवी साखळीच्या माध्यमातून समाजात अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता वाढवण्यावर भर देण्यात आला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये तसेच उपस्थित नागरिकांमध्ये अंमली पदार्थांविरुद्ध एक सकारात्मक संदेश पोहोचवण्यात पोलिसांना यश मिळाले.