मिहिर मोंडकर यांचे सेट परीक्षेत यश

Edited by: विनायक गांवस
Published on: September 10, 2025 16:59 PM
views 435  views

सावंतवाडी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागाने सहाय्यक प्राध्यापकपदासाठी घेतलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षेत सावंतवाडी येथील मिहिर राजेश मोंडकर यांनी यश मिळविले. 

त्यांनी लॉ विषयातून सेट परीक्षा दिली होती. महाराष्ट्र आणि गोव्यातील एकूण एक लाख दहा हजार ४१२ विद्यार्थ्यांनी सेट परीक्षेसाठी अर्ज केला होता. त्यातील ९० हजार ३६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेत एकूण ६.६९ टक्के म्हणजेच केवळ ६०५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मिहिर मोंडकर यांनी पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.ए. एल. एल. बी. पदवी प्राप्त केली. तर पवई-मुंबई येथील महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीतून एल.एल.एम. पदवी प्राप्त केली आहे.