कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांची मिहीर मठकर यांनी घेतली भेट...!

Edited by:
Published on: April 30, 2024 11:03 AM
views 371  views

सावंतवाडी : कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांची सावंतवाडी रेल्वे स्थानकात भेट घेतली. संतोषकुमार झा हे कोकण रेल्वेच्या स्थानकांच्या पाहणी दौऱ्यावर आले असता कोकण रेल्वे प्रवासी संघटना सचिव मिहीर मठकर, उपाध्यक्ष भुषण बांदिवडेकर आदींनी त्यांची भेट घेतली. रखडलेल्या सावंतवाडी टर्मिनससह स्थानकातील विविध प्रश्नांवर चर्चा केली.

तसेच याप्रसंगी संतोष कुमार झा यांची संचालक पदी नियुक्ती होऊन पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सावंतवाडी स्थानकाच्या विकासासाठी आपण सकारात्मक आहोत असे सांगत संतोष कुमार झा यांनी प्रवासी संघटनेच्या मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन दिले.