मिहीर मठकरांनी सावंतवाडी टर्मिनसबाबत वेधल विरोधीपक्षनेत्याच लक्ष

Edited by: विनायक गावस
Published on: July 11, 2023 17:09 PM
views 261  views

सावंतवाडी : फेज वनच काम होऊन फेज टू च काम बरीच वर्षे रखडलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनस संदर्भात विरोधीपक्षनेते जितेंद्र आव्हाड यांची माजी आमदार जयानंद मठकर यांचे नातू मिहिर मठकर यांनी भेट घेतली. याबाबतच निवेदन विरोधीपक्षनेते जितेंद्र आव्हाड यांना देण्यात आले. सावंतवाडी टर्मिनस तसेच स्टेशनवर असणाऱ्या मूलभूत गरजा बद्दल डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी मिहीर मठकर यांनी माहिती दिली. रेल्वेना न मिळणाऱ्या थांब्याबाबत त्यांनी आव्हाडांच लक्ष वेधत यावर येत्या पावसाळी अधिवेशनात विरोधीपक्षनेता म्हणून आवाज उठवावा व सावंतवाडीकर जनतेला दिलासा मिळवून द्यावा अशी मागणी केली.