तिलारीच्या कालव्यात बुडून परप्रांतीय कामगाराचा मृत्यू

दोडामार्ग म्हावळकरवाडी येथील घटना
Edited by: संदीप देसाई
Published on: April 24, 2023 19:55 PM
views 242  views

दोडामार्ग : तीलारीच्या कालव्यात दोडामार्ग येथे आंघोळीसाठी पाण्यात उतरलेल्या परप्रांतीय कामगाराचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली. बाळकृष्ण सिद्ध गोविंद सोणाने (वय ५०) असे मृत कामगाराचे नाव आहे.

 दोडामार्ग म्हावळकरवाडी येथे आंघोळीसाठी पाण्यात उतरला होता. पण त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडून मयत झाला. सोबत असलेल्या त्याच्या सहकाऱ्यांनी आरडा ओरड केली. त्याला तत्काळ पाण्यातून काढून त्यांनी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याला ते वाचवू शकले नाही. रुग्णालयात दाखल केल्यावर वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेचा अधिक तपास दोडामार्ग पोलीस करत आहेत.