
सावंतवाडी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सावंतवाडी तालुका संघटकपदी कोलगावचे माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा यांची निवड जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केली असून सावंतवाडीचे माजी उपसभापती चंद्रकांत कासार यांची उपजिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी ही निवड जाहीर केली आहे. मायकल डिसोजा यांना युवकांचे मोठे पाठबळ आहे. तर चंद्रकांत कासार यांनी शिवसेनेतून यापूर्वी उपसभापतीपद भूषविले आहे तसेच ते अनेक वर्षापासून शिवसेनेत कार्यरत आहेत. या दोघांचेही शिवसेनेत संघटना वाढवण्यात मोठे योगदान असून त्यांच्या या कार्यांची दखल घेऊन त्यांची या पदावर निवड करण्यात आली आहे.