कॅथॉलिक अर्बन पतसंस्थेच्या संचालकपदी मायकल डिसोजा

Edited by: विनायक गावस
Published on: January 15, 2024 14:13 PM
views 143  views

सावंतवाडी : कॅथॉलिक अर्बन पतसंस्थेच्या संचालकपदी ठाकरे शिवसेनेचे युवा नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रधान कार्यालयात आज ही निवड प्रकिया झाली. त्यांची नियुक्ती झाल्यानंतर ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. पतसंस्थेचे दिवंगत संचालक फ्रान्सिस डिसोझा यांचे ते सुपुत्र आहेत. फ्रान्सिस डिसोझा हे देखील या पतसंस्थेचे संचालक होते. याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, संदीप मालकर,मेघशाम काजरेकर, अशोक परब , देवेंद्र टेबकर,संदीप गवस, शिवदत्त घोगळे, नामदेव नाईक, चेतन बामने, गोपालकृष्ण फोंडबा,सोनू कासार , महादेव राऊळ, निलेश परब, अनिरुद्ध पाटकर आधी उपस्थित होते. यावेळी रूपेश राऊळ यांनी  डिसोझा यांना शुभेच्छा दिल्या.यापूर्वी तुमचे वडील फ्रान्सिस डिसोजा यांनी कॅथलिक बँकेत प्रामाणिकपणे काम केले आहे.राजकीय सामाजिक सहकार क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते हाच पायंडा मायकल यांनी आपल्या जीवनात पुढे न्यावा आणि राजकीय जीवनासह सहकार क्षेत्रात आपली प्रगती करावी विशेष करून गरजू लोकांच्या कायम पाठीशी राहावे असे आवाहन राऊळ यांनी केले.