म्हापण जि.प. मतदार संघात शैलेश परब यांचा झंझावाती संवाद दौरा

Edited by: विनायक गावस
Published on: November 28, 2023 20:04 PM
views 99  views

वेंगुर्ला : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब यांनी वेंगुर्ला तालुक्यात खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनखाली झंझावाती संवाद दौरा केला. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर चर्चा करून संघटनात्मक निर्णय घेण्यात आले. या दौऱ्याला म्हापण मतदार संघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 


यावेळी शैलेश परब यांनी म्हापण जिल्हा परिषदेतील कुशेवाडा, परुळे बाजार, म्हापण, निवती या गावातील पुरुष, महिला कार्यकर्ते, युवा सैनिक यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला व जेष्ठ शिवसैनिकांकडून त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेतले. त्यावेळी वेंगुर्ला तालुका संपर्कप्रमुख बाळा चीपकर, तालुकाप्रमुख यशवंत बाळु परब, महिला तालुका संघटिका सुकन्या नरसुले, शहरप्रमुख अजित राऊळ, मनोहर येरम यांच्यासाहित इतर उबाठा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.