म्हापण जि.प. मतदारसंघात केसरकरांना सर्वाधिक मताधिक्य

कोचरा सरपंच योगेश तेली यांनी मतदारांचे मानले आभार
Edited by:
Published on: November 27, 2024 12:53 PM
views 364  views

वेंगुर्ला : सावंतवाडी विधानसभा निवडणूकित महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांना म्हापण जिल्हा परिषद मतदार संघात एकूण 4688 मते मिळाली तर महाविकास आघाडी चे उमेदवार राजन तेली यांना एकूण 2319 मते मिळाली. संपूर्ण तालुक्याचा विचार करता म्हापण जिल्हा परिषद मतदार संघाने दीपक केसरकर यांना सर्वाधिक म्हणजे 2369 एवढे मताधिक्य दिले. याचे सर्व श्रेय हे महायुतीच्या सर्व पदाधिकारी यांना जाते. तर म्हापण जि प मतदार संघातील मतदारांनी विकासाच्या बाजूने कौल दिल्याबद्दल सर्व मतदारांचे जाहीर आभार कोचरा सरपंच योगेश तेली यांनी व्यक्त केले आहेत.

खासदार नारायण राणे, जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांनी केलेल्या सूक्ष्म नियोजन व जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, शिवसेना जिल्हा संघटक संजू परब,  पंचायत समिती माजी सभापती निलेश सामंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,  विभागप्रमुख दत्ता साळगावकर यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शना मुळे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी व आरपीआय च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी झोकून देऊन महायुती आमदार केसरकर यांना निवडून आणण्यासाठी दिवस रात्र केलेली मेहनत या मुळेच एवढे मताधिक्य मिळणे शक्य झाले.

या यशाबद्दल म्हापण जिल्हा परिषद मतदार संघातील महायुतीच्या सर्व तालुका व जिल्हा पदाधिकारी, गाव प्रमुख, सर्व शक्ती केंद्र प्रमुख, शाखा प्रमुख, सर्व बूथ अध्यक्ष, सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,महिला मोर्चा, शिवसेना महिला संघटना, युवा मोर्चा, युवासेना च्या सर्व पदाधिकारी, सर्व विकास सोसायटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक व कार्यकर्ते यांचे जाहीर आभार अशी प्रतिक्रिया योगेश तेली यांनी व्यक्त केली आहे.