
देवगड : हवामान विभागाचा २४ ऑगस्टपर्यत वादळाचा इशारा असल्यामुळे गुजरात,डहाणूसह येथील नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. मच्छिमारीला सुरूवात झाली असतानाच मात्र हवामान विभागाने २४ ऑगस्टपर्यत वादळाचा इशारा दिल्यामुळे गुजरात,डहाणूसह येथील शेकडो नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत.याचा परिणाम मच्छीमारीवरती होऊन मच्छिमारी देखील ठप्प झाली आहे.खोल समुद्रातील मासेमारीला १ ऑगस्टपासून सुरूवात झाली. मात्र वातावरण पोषक नसल्याने पाच ते सहा दिवसांनी मासेमारी सुरू झाली.कांडाळी, न्हैय व यांत्रिक नौकांद्वारे मासेमारी सुरू झाली.बांगडा, पापलेट, मोरी, कोळंबी, सौदांळे आदी मासळी मिळण्यास सुरूवात झाली मात्र पापलेट मोरीसारखी दर्जेदार मासळी मिळूनही त्यांना दर चांगला मिळाला नाही.सध्या समुद्रात मासळी मिळणेही दुरापास्त झाल्याने नौका देवगड बंदरातच उभ्या आहेत. वादळसदृश स्थिती निवाळल्यानंतर मासेमारीला सुरूवात होईल असे
मच्छिमारां मधून सांगण्यात येत आहे.नारळीपौर्णिमेनंतर खऱ्या अर्थाने मासेमारीला सुरूवात झाली असतानाच समुद्रात वादळसदृश वातावरण तयार झाल्याने मच्छिमारांने समुद्रात मच्छिमारीसाठी जावू नये असा इशारा हवामान विभागाने दिला यामुळे गुजरातसह शेकडो नौका देवगड बंदरात दाखल झाल्या असून खोल समुद्रातील मासेमारी ठप्प झाली आहे.२४ ऑगस्टपर्यंत वादळसदृश स्थिती निर्माण झालेली पाहायला मिळत आहे.