
वेंगुर्ला : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना वेंगुर्ला यांच्या वतीने तालुक्यातील दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम ३० जून रोजी सकाळी येथील साई डीलक्स हॉल येथे खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न होणार आहे. यावेळी युपीएससी परीक्षेत देशात ७६ वा आलेल्या दाभोली येथील वसंत दाभोलकर व निट परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या मठ येथील प्रणव कामत यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब, माजी आमदार शंकर कांबळी, उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना नेते अतुल रावराणे, संदेश पारकर, सतीश सावंत, बाळा गावडे, वेंगुर्ला संपर्क प्रमुख भालचंद्र चिपकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हा संघटिका जान्हवी सावंत, युवानेते विक्रांत सावंत, युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट आदी मान्यवर उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी, शिवसैनिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी केले आहे.