
सावंतवाडी : सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा कॉग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख, कॉग्रेस नेते अँड. दिलीप नार्वेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, शहराध्यक्ष ॲड. राघवेंद्र नार्वेकर, रविंद्र म्हापसेकर,विभावरी सुकी, युवक जिल्हा उपाध्यक्ष जास्मिन लक्ष्मेश्वर,अमिदी मिस्त्री , संजय लाड, शहर युवक कॉग्रेस अध्यक्ष बासिप पडवेकर,नूतन सावंत व इतर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूञसंचालन रविंद्र म्हापसेकर तर आभार जास्मिन लक्ष्मेश्वर यांनी मानले.