रवळनाथ विद्यामंदिरात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान...!

Edited by: विनायक गावस
Published on: July 17, 2023 12:04 PM
views 158  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे येथील रवळनाथ विद्यामंदिर येथे आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान समारंभ संपन्न झाला. शैक्षणिक आयुष्यातील सर्वात महत्वाच्या परीक्षा समजल्या जाणाऱ्या १० वी , १२ वी च्या परिक्षांबाबत विद्यार्थी वर्षभर मानसिक तणावात असतात. त्यांच्या निकालानंतर त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकने व त्यांना प्रोत्साहन देणे हा यामागचा उद्देश होता.

या कार्यक्रम प्रसंगी माझ्या समवेत सरपंच आत्माराम ऊर्फ दाजी गावकर, उपसरपंच संतोष कासकर, सरपंच रविन्द्र म्हापसेकर, सामजिक कार्यकर्ते सगुण गावकर, मुख्याध्यापक राजेंद्र देसाई, विलवडे सरपंच प्रकाश दळवी, नेहा मयेकर, परेश धरणे, रमेश परब भालावल, कन्हैय्या मयेकर, जयगणेश गावकर, विनायक वर्णेकर आदी पदाधिकारी देखील उपस्थित होते.