चर्मकार समाज उन्नती मंडळाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Edited by:
Published on: December 10, 2023 18:29 PM
views 124  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या सावंतवाडी तालुका शाखेच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये बोलताना मंडळाचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड अनिल निरवडेकर यांनी चर्मकार समाज बांधवांचे हक्काचे ओरोस येथील संत रोहिदास भवनाचे काम   अंतिम टप्प्यात आले असून येत्या महिनाभरात  यासाठी लागणाऱ्या दीड कोटी रुपयांच्या निधीची तरतूद राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून होईल असा विश्वास व्यक्त केला. समाज बांधवांचे स्वप्न लवकरच साकार होईल असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. त्यांनी समाज बांधवातील वकील, डॉक्टर  पासून ते एमबीए पर्यंत शिक्षण घेणाऱ्या गुणवंत मुलांच्या यशाचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन मुंबई येथील एलआयसी अधीक्षक अभियंता रवीकिशोर चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी तालुका अध्यक्ष गणेश म्हापणकर , जिल्हा खजिनदार नामदेव चव्हाण, संत रोहिदास सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष तानाजी वाडकर, जिल्हा बँकेचे संचालक आत्माराम ओटवणेकर जिल्हा सदस्य संजना चव्हाण बाबुराव चव्हाण विनायक चव्हाण विजय चव्हाण,  वसुंधरा चव्हाण दिलीप इन्सुलकर सुरेश पवार पी बी चव्हाण लवू चव्हाण प्रशांत चव्हाण सुधाकर बांदेकर भाग्यवंत वाडीकर वैशाली चव्हाण आदी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुंडू चव्हाण व जगदीश चव्हाण यांनी केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेश म्हापणकर हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटक नंदकिशोर चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांचा कल नेमका कुठे आहे ते पाहूनच योग्य ते शिक्षण घेण्याची गरज असून आकलन शक्तीच्या बाहेर चे शिक्षण मुलावर लादू नका असे आवाहन केले. यावेळी त्यांनी शिक्षणाच्या वाटा व त्यादृष्टीने व्यवसाय व नोकरी धंद्याच्या दृष्टीने कोणत्या प्रकारचे शिक्षण घेता येईल याबाबत करियर मार्गदर्शन केले. यावेळी गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये ओंकार कारिवडेकर, मयूर जाधव, सुरेश चव्हाण, गौरवी बांबुळकर, प्रज्ञा साळगावकर, देवराज कारिवडेकर गौरवी सांगेलकर श्रेयस चव्हाण तसेच अरुंधती चव्हाण, डॉ प्रथमेश चव्हाण, डॉ अंकिता सांगेलकर यशस्वी सरंबळकर  डॉ यश पवार आयुष चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर स्मशानभूमीत अहोरात्र काम करणारे मारुती निरवडेकर यांचा खास सत्कार यानिमित्ताने करण्यात आला. यावेळी समाज भूषण पुरस्कार प्राप्त आणि कोलगाव विविध विकास सहकारी सोसायटीच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल बाबुराव चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सैनिक सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल शांताराम पवार यांचाही सत्कार करण्यात आला. सावंतवाडी तालुका चर्मकार बांधवांना एकत्र करून विविध प्रकारचे उपक्रम राबविल्याबद्दल सावंतवाडी चर्मकार उन्नती मंडळाचे अध्यक्ष गणेश म्हापणकर या निमित्ताने उभयतांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर विविध क्षेत्रातील निवृत्त कर्मचारी तसेच बढती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. यामध्ये तृप्ती चव्हाण यांच्यासह अनेकांचा सत्कार करण्यात आला. शेवटी आभार प्रदर्शन जगदीश चव्हाण यांनी केले.