
सावंतवाडी : तालुका भंडारी मंडळ, सावंतवाडी आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत पार पडला. भंडारी भवन येथे या सोहळ्याच आयोजन करण्यात आले होते. यावेळी भंडारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मंत्री केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला.
तालुका भंडारी मंडळ, सावंतवाडी आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा भंडारी भवन येथे पार पडला. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी सावंतवाडीतील जनता हे माझं कुटूंब आहे. जनतेशी माझं जिव्हाळ्याच नातं आहे. सामाजिक कार्यात भंडारी समाजाच योगदान मोठं आहे. त्यामुळे जेव्हा माझी मदत लागेल त्यावेळी मी तुमच्यासोबत असेन असं मत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.
यावेळी भंडारी समाज मंडळाच्यावतीने दीपक केसरकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रसाद अरविंदेकर, गुरूदास पेडणेकर, गुरूनाथ पेडणेकर, सिद्धार्थ पराडकर, शितल नाईक, हनुमंत पेडणेकर, देविदास आडारकर, लवू कुडव, निलेश कुडव, दिलीप पेडणेकर नामदेव सतेलकर, राजेंद्र बिर्जे, चंदू वाडकर, शेखर पेडणेकर, देवता पेडणेकर, समता सूर्याजी, गुरुदास पेडणेकर, संजय पिळणकर आदी भंडारी समाज बांधव उपस्थित होते.