पडवे माजगाव मध्ये 'मेरी मिट्टी मेरा देश अभियान' उत्साहात

ध्वजारोहण, शीलाफलक अनावरण, माजी सैनिक सन्मान, हर घर तिरंगासह विविध कार्यक्रम
Edited by: संदीप देसाई
Published on: August 13, 2023 19:44 PM
views 282  views

दोडामार्ग : ग्रामपंचायत पडवे माजगाव मेरी मिट्टी मेरा देश अभियान अंतर्गत ग्रामपंचायत अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून शिलाफलकाचे अनावरण सरपंच नयना देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.

त्याच बरोबर ध्वजारोहण, पंचप्राण शपथ, वृक्षारोपण, शहीद वीरांना श्रद्धांजली, गावातील सर्व माजी सैनिक, निवृत्त पोलीस यांचा सत्कार सन्मान सोहळा करण्यात आला. तर मूठ माती कलशात भरणे, हर घर तिरंगा अभियानातर्गत प्रत्येक घरी तिरंगा झेंडा फडकविणे याबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले.  यावेळी सरपंच नयना देसाई यांसह उपसरपंच प्रज्ञा देसाई, ग्रामसेवक विणा धुरी, ग्रा.पं सदस्य, सर्व माजी सैनिक व माजी पोलिस, शा. व्य. अध्यक्ष, पोलिस पाटील, शालेय मुख्याध्यापक, सहशिक्षक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ माजी सैनिक भिवसेन देसाई, भिवसेन गवस, लक्ष्मण भोगले, राजन देसाई, प्रकाश डेगवेकर, चंद्रकांत देसाई, लक्ष्मण देसाई, माजी पोलिस रमेश देसाई, अर्जुन देसाई आदी उपस्थित होते.