
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्या. सिंधुदुर्गनगरी या संस्थेच्या विकासात मालक सभासदांनी दिलेले योगदान मोलाचे असल्यानेच अशा सभासदांचा गौरव संस्था करीत असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष चंद्रसेन पाताडे यांनी केले. संस्थेच्या वतीने सलग २५ वर्षे सभासदत्व धारण केलेल्या सभासदांचा सत्कार प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या प्रधान कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथील कै. द.सि.सामंत सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रसेन पाताडे, उपाध्यक्ष ऋतुजा जंगले,उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाचे अधीक्षक श्रीकृष्ण मयेकर, संचालक सर्वश्री संतोष मोरे,नारायण नाईक,संतोष राणे,श्रीकृष्ण कांबळी,मंगेश कांबळी,सीताराम लांबर,सचिन बेर्डे,संजय पवार,महेंद्र पावसकर,समीक्षा परब,तज्ज्ञ संचालक किशोर कदम,संघटना प्रतिनिधी विठ्ठल गवस,तुषार आरोसकर,बाबाजी झेंडे,विवेक माईणकर,समीर जाधव,निलेश ठाकूर आदी उपस्थित होते.
यावेळी सुमारे दोनशे सभासदांचा गौरव संस्थेच्या वतीने करण्यात आला.सत्कारमूर्तींच्या वतीने संजय पाताडे,नंदकुमार राणे,सत्यवान घाडीगांवकर,उन्नती कराळे,त्रिंबक आजगांवकर,गीतांजली हरमलकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनुराधा माईणकर,संयोजन अकौंटट मनोज सावळ, संगणक तज्ज्ञ समीर नातू यांनी केले.शेवटी आभार उपाध्यक्ष ऋतुजा जंगले यांनी मानले.