राज्य मागासवर्ग आयोग 25 ते 30 जानेवारीदरम्यान सिंधुदुर्ग दौऱ्यावर

जात समुहांच्या संघटना प्रतिनिधींसोबत करणार चर्चा
Edited by: प्रतिनिधी
Published on: January 16, 2023 18:23 PM
views 177  views

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे  सदस्य  प्रा. संजीव सोनावणे, ॲङ बी. एल सगर किल्लारीकर व ज्योतिराम चव्हाण हे बुधवार दि. 25 ते 30 जानेवारी या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.


दौरा पुढीलप्रमाणे : बुधवार दि. 25 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 1.30 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपविभागीय दंडाधिकारी व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक. वैश्यवाणी या जात समुहाची जाहिर जनसुनावणी व आयत्या वेळी आलेल्या जात समुहांच्या संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा. घिसाडी, गाडी लोहार या समाजास जात प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणीविषयी जात प्रमाणपत्र निर्गमन अधिकाऱ्यांसोबत चर्चा व आढवा बैठक. दुपारी 3 वाजता देवगड, जि. सिंधुदुर्गकडे रवाना व मुक्काम.

गुरुवार दि. 26 जानेवारी रोजी 11 ते 4 वाजेपर्यंत वैश्यवाणी या जात समुहाची जाहिर जनसुनावणी व आयत्या वेळी आलेल्या जात समुहांच्या संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने अहवाल लेखन व मुक्काम.  शुक्रवार दि. 27 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 4 आश्रमशाळा व शासकीय वसतिगृहे यांना भेट. दिनांक 28 व 29 जानेवारी  रोजी  शासकीय कामकाज व दि.29 जानेवारी  रोजी दुपारी 3. वाजता वेंगुर्ले येथे आगमन व मुक्काम. सोमवार दि.30 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 1.30 वाजता जिल्ह्यातील मच्छिमार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा. दुपारी 3. वाजता पुण्याकडे प्रयाण.