
कणकवली: करूया दान रक्ताचे वाचवूया प्राण अनेकांचे या उप्तीप्रमाणे कै. उत्तम धुमाळे यांच्या प्रथम स्फूर्तीदिनानिमित्त कणकवली चौंडेश्वरी मंदिर हाॅल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 25 जणांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते फीत कापून व उत्तम धुमाळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, विराज भोसले, अभिजीत मुसळे, नाना कांबळे, प्रज्ञा ढवन, अण्णा कोदे, भरत उबाळे, जयेश धुमाळे, अनंत हजारे, राजश्री धुमाळे, उत्कर्ष धुमाळे, चैत्राली धुमाळे, हे उपस्थित होते. तसेच सावंतवाडी ब्लड बँकेच्या माध्यमातून डॉक्टर सागर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्राजक्ता रेडकर, मानसी बागेवाडी,अनिल खाडे, राहुल जाधव हे उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथील उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी उत्तम धुमाळे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले तसेच मेहुल धुमाळे यांनी अशाच पद्धतीने वडिलांचे नाव मोठे करावे व आरोग्यदायी सामाजिक उपक्रम राबवावेत त्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी असल्याचे नलावडे यांनी सांगितले
मेहुल यांनी वडिलांकडून मिळालेला वारसा आपण पुढे नेत आहोत धुमाळे परिवार नेहमी सर्वांनाच मदत करत असते तशाच पद्धतीने आपण सामाजिक हिताची कामे करत असून आज रक्तदान शिबिरामध्ये बहुसंख्य रक्तदात्यांनी रक्तदान केल्याबद्दल त्यांचे आभार मानत अशाच पद्धतीने भविष्यातही आम्हाला सहकार्य करावे असे सांगितले या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी करत कार्यक्रमाची शोभा वाढवली