देवगडमध्ये अंगणवाडी सेविका - मदतनीस मेगा भरती

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 09, 2025 16:03 PM
views 828  views

देवगड : देवगड प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडी मदतनीस भरतीचे आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये विजयदुर्ग ( बाजारपेठ ), बापर्डे (काळेश्वरवाडी ) , मुटाट ( बौद्धवाडी ), गोवळ ( तांबेवाडी ) , पोभुर्ले ( बागबौद्धवाडी ,घाडीवाडी, देऊळवाडी ), कुणकवण ( बंदरवाडी ) , मिठमुंबरी ( बागवाडी ) मणचे (गावठण ) ठाकुरवाडी ( नवानगर ) , सौंदाळे ( वाडाकेरपोई ) , नारींग्रे ( गांगेश्वर ) ,गढिताम्हाणे आदी गांवा मध्ये अंगणवाडी मदतनीस  तसेच गोवळ ( गावठण ) , शिरगांव ( तावडेवाडी )  अंगणवाडी सेविका भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. 

गावांतील इच्छुक पात्र महिला उमेदवारांनी दिनांक ९ एप्रिल २०२५ ते २३ एप्रिल २०२५ पर्यंत सुट्टीचा दिवस वगळुन देवगड बालविकास प्रकल्प कार्यालय पंचायत समिती देवगड येथे अर्ज करावा असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी देवगड बाबली होडावडेकर यांनी केल आहे.